महाराष्ट्रभर टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या अनुसूचित जमातीला जात प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्याचे काम प्रांताधिकारी व वैद्यता समिती करीत आहेत. म्हणून या जमातीच्या गरीब आणि दुबळ्या नागरिकांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतात. मात्र यातून आम्हाला न्याय नक्की मिळतो आणि असा न्याय मिळू नये याकरिता न्यायालयाऐवजी जात वैधता प्रमाणपत्र तपासणी समितीवर अजून एक अपिलीय समिती बसवण्यात येत असल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. मात्र या निर्णयामुळे मुळचे टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी जमातीवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. किंवा हायकोर्टाचे दरवाजे बंद करण्यासाठी आणि ज्यांना या अगोदरच जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त आहे त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी शासन आणि शासनात बसलेले विरोधक असली अन्यायकारी भूमिका भारतीय जनता पक्षाकडून बजावून घेण्याच्या बेतात आहेत
जर का महाराष्ट्र शासनाने असा अन्यायकारक निर्णय घेतला तर आम्हाला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन मतदान करावे लागेल आणि ही आमची हिंदूंची आवडती सत्ता आम्हालाच घालवावी लागेल. असा दिवस महाराष्ट्रावर येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने अन्यायकारक निर्णय घेण्याचे रद्द करावे. अन्यथा आम्हीही महाराष्ट्रातील एक कोटी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे सर्व बांधव आपल्या विरोधात मतदान करू, खान्देशातील जळगाव, धुळे, साक्री, शहादा आणि नंदुरबार मतदार संघात टोकरे कोळी समाज स्वतःचा उमेदवार देऊन भारतीय जनता पार्टी सरकारला पायउतार करण्याचा निर्णय घेऊ शकतो. असे समस्त टोकरे कोळी समाजाच्या वतीने सांगण्यात आले. या आशयाचे निवेदन आज केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना देण्यात आले. यावेळी, गणेश कोळी, खंडेराव कोळी, दादा कोळी, धारु कोळी, अर्जुन शिरसाट, गोलू वाघ, गुलाब कोळी, नगिन कोळी, विशाल कोळी,कल्याण कोळी, भरत कोळी, सुरेश कोळी, राजेंद्र कोळी, मनीलाल कोळी , योगेश्वर कोळी , नरेंद्र कोळी आदी उपस्थित होते.दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…
बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…
