रक्षाबंधन निमित्त बहिणींना सिहोर येथील रुद्राक्ष भेट ; अमोल शिंदे

रक्षाबंधन निमित्त बहिणींना सिहोर येथील रुद्राक्ष भेट ; अमोल शिंदे. सिहोर येथील १ लाख ८ हजार रुद्राक्षांचा अभिमंत्रित महारुद्राभिषेक सोहळा

पाचोरा/ भडगाव तालुका प्रतिनिधी : यशकुमार पाटील  पाचोरा : भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या वतीने सिहोर (मध्यप्रदेश) येथील १ लाख ८ हजार अभिमंत्रित करुन सिद्ध रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन दिनांक १९ ऑगस्ट सोमवार रोजी करण्यात आले असून श्री कैलादेवी माता मंदिर, भडगाव रोड पाचोरा येथे सकाळी ११ वाजेपासून ११ पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने या महारुद्राभिषेक सोहळ्याची सुरुवात होईल. श्रावण सोमवारी दिवसभर या १ लाख ८ हजार रुद्राक्ष जडीत भव्यदिव्य शिवपिंडीचे अभूतपूर्व दर्शन भाविकांना यावेळी घडणार आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व श्रावणी सोमवार अशा परमपवित्र त्रिवेणी शुभ मुहूर्तावर अमोल शिंदे यांनी पाचोरा नगरीत महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. सिहोर (मध्यप्रदेश) येथून अभिमंत्रित करून सिद्ध केलेल्या 1 लाख 8 हजार पवित्र रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक पाचोरा शहरात होत आहे. धर्मशास्त्राप्रमाणे पवित्र मानलेल्या श्रावण मासात, रक्षाबंधनाच्या निमित्त, नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने हे रुद्राक्ष पाचोरा व भडगाव तालुक्यातील माझ्या सर्व बहिणींना त्यांच्या कुटुंबाच्या रक्षणार्थ व कल्याणार्थ दिव्यभेट म्हणुन दुसऱ्या दिवशी मंगळवार पासून येथील प्रत्येक बहिणीला वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शास्त्रामध्ये रुद्राक्षला अत्यंत पवित्र व महत्त्वाचे स्थान आहे. सिहोर (मध्यप्रदेश) येथील अलौकीक अध्यात्मिक शक्ती असलेले पवित्र व अभिमंत्रित तथा सिद्ध केलेले रुद्राक्ष या रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमोल शिंदे यांच्या माध्यमातून मंगळवारपासून बहिणींच्या घराघरात श्रद्धापूर्वक पोहोचते केले जाणार आहेत. श्रावण सोमवार निमित्त आयोजित या महारुद्राभिषेक सोहळ्याला पाचोरा येथील श्री. कैला देवी माता मंदिरात उपस्थिती द्यावी व रुद्राक्ष जडीत अलौकिक शिवपिंडीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन अमोल शिंदे यांनी या निमित्ताने केले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.