नाशिकमध्ये बहु गलबला…! ध्वनिप्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी; पर्यावरण अहवालाचे निष्कर्ष धक्कादायक.

पर्यावरण विभागाच्या अहवालात शहरातील पंचवटी कारंजा, द्वारकासारख्या निवासी भागासह सीबीएस, त्र्यंबक रोड, पाथर्डी फाटा, तसेच मुंबई नाकासारख्या व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.नाशिक महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अहवालातून स्वच्छ, सुंदर आणि शांत अशी नाशिकची ओळख आता धोक्यात आली आहे. शहरात हवेच्या प्रदूषणापाठोपाठ आता ध्वनिप्रदूषणानेही धोक्याची घंटा वाजवली आहे. पर्यावरण विभागाच्या अहवालात शहरातील पंचवटी कारंजा, द्वारकासारख्या निवासी भागासह सीबीएस, त्र्यंबक रोड, पाथर्डी फाटा, तसेच मुंबई नाकासारख्या व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

निवासी भागात ६५ डेसिबल, तर अनिवासी आणि औद्योगिक भागातील ध्वनिप्रदूषणाने ७० डेसिबलचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे नाशिककरांना बहिरेपणासह, मानसिक आणि शारिरीक असंतुलन, हृदयविकार यांसारखे आजार बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार शहराची निवासी, व्यापारी, औद्योगिक आणि शांतता या चार झोनमध्ये विभागणी केली असून, ध्वनी पातळीची मानके प्रस्थापित करण्यात आली आहेत.

शहराभोवतीचे वाढते औद्योगीकरण, रेल्वे, विमान, वाहने, तसेच फटाके, ध्वनिक्षेपके, डीजे यामुळे शहरी भागातील आवाजाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. ध्वनिप्रदूषणाचा परिणाम मानवाच्या शरीरावर होत आहे. मानसिक व शारीरिक संतुलन बिघडू लागले आहे. ध्वनिप्रदूषणाचा प्राणी, पक्षी आणि वनस्पतीवरही परिणाम होतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याची शिफारस पर्यावरण अहवालातून करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.