मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने बापाला संपवलं, नागपुरातील हत्याकांडाला पोलीस जबाबदार?

नरेश वालदे यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट चारने नीतेश ऊर्फ नाना मेश्राम व त्याच्या दोन साथीदारांना मौदा परिसरात अटक केली.इमामवाडा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच नरेश संताराम वालदे (वय ५५, रा. इंदिरानगर, जाटतरोडी) यांचा खून झाल्याची (Nagpur Murder) धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी वेळीच नानाविरुद्ध कारवाई केली असता तर खुनाची घटना (Crime News) टळली असती, असे बोलले जात आहे.
दरम्यान, नरेश यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट चारने नीतेश ऊर्फ नाना मेश्राम (वय २६) व त्याच्या दोन साथीदारांना मौदा परिसरात अटक केली. ईश्वर ऊर्फ जॉकी राजेश सोमकुंवर (वय ३२) व अक्षय दीपक आवळे (वय २९, तिन्ही रा. रामबाग) अशी अटकेतील अन्य मारेकऱ्यांची नावे आहेत.

नाना हा नरेश यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करायचा, तिला त्रास द्यायचा. नाना यांनी त्याला हटकले. त्यामुळे संतापलेल्या नानाने मंगळवारी रात्री नरेश यांच्या घरावर दगडफेक केली. नरेश यांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. परंतु, पोलिसांनी प्रकरणाच्या गांभीर्याकडे लक्ष दिले नाही.नानाविरुद्ध कठोर कारवाई केली नाही. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्याचीही ‘तसदी’ घेतली नाही. पोलिसांत तक्रार दिल्याने नाना संतापला. त्याने साथीदारांच्या मदतीने नरेश यांचा खून करण्याची योजना आखली.बुधवारी दुपारी नाना व त्याच्या साथीदारांनी जाटतरोडी पोलिस चौकीसमोरच धारदार शस्त्राने वार करून नरेश यांची हत्या केली. याबाबत इमामवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.नाना हा नरेश यांच्या मुलीला त्रास द्यायचा. चार वर्षांपूर्वी नानाने त्यांच्या मुलीला मारहाण केली. त्यांच्या वाहनांची जाळपोळ केली. या प्रकरणी नानाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मंगळवारी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी नानाचा गुन्हेगारी अभिलेख का तपासला नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शिस्तप्रिय वरिष्ठ पोलिस अधिकारी आता काय कारवाई करतात याकडेही लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.