आयुष्यभर सोबत देण्याचं वचन महिनाभरात मोडलं, पतीचा अचानक मृत्यू, नवविवाहितेचा आक्रोश पाहून सारे सुन्न.

एक होतकरु शेतकरी, यशस्वी आंबा व्यवसायिक असलेल्या एका तरुणाच्या अकाली एक्झिटने संपूर्ण परिसरात अकच खळबळ माजली आहे. या तरुणाच्या लग्नाला फक्त एक महिना झाला असल्याची माहिती आहे.अलीकडे रत्नागिरीत रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चार दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा दुजाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नाखरे येथील एका युवकाचाही दुचाकी अपघातात दुर्देवी अंत झाला आहे. चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असं या तरुणाचं नाव आहे. चंद्रवदन हा पावस येथून नाखरे येथील आपल्या घरी परत जात असताना त्याच्या दुचाकीला अपघाता झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. नेहमी हसतमुख चेहरा असलेल्या आंबा बागायत युवकाने अचानक जगातून एक्झिट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.नाखरे गावात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मयत तरुणाचे नाव चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असे असून, तो नाखरे येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रवदन हा पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून परतत असताना हा अपघात घडला. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची एका चारचाकी इको गाडीशी जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर घडला.चंद्रवदन हा एक हसतमुख चांगल्या स्वभावाचा तरुण असल्याचं त्याचे मित्र सांगतात. त्याला ट्रेकिंगची आवड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यवसायिक म्हणूनही ओळखला जात होता.

त्याने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि नुकतेच महिन्याभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. अशा अचानक त्याच्या जाण्याने त्याची नवविवाहित पत्नीला मोठा धक्का बसला आहे. लेकाचं लग्न झाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. मात्र, या घटनेने त्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.