जळगाव जिल्ह्यात 340 कोटींचे कर्जवाटप;3 दिवस विशेष कॅम्पचे आयोजन.

जळगाव जिल्ह्यात 340 कोटींचे कर्जवाटप;3 दिवस विशेष कॅम्पचे आयोजन. जळगाव/प्रतिनिधी :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 30000 स्वयंसाहाय्यता समूह आहेत या स्वयंसहाय्यता समूहांमध्ये तीन लक्ष एवढ्या महिला आहेत जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी असलेल्या उद्दिष्टापैकी यावर्षी 340 कोटी रुपये 13000 स्वयंसाहायता समूहांना कर्ज स्वरूपात दिलेले आहे दिनांक 26 27 व 28 मार्च रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी महिला बचत गटांसाठी विशेष कॅम स्वरूपात कर्जवाटप पीएमईजीपी योजना संदर्भात तथा पी एम एफ एम ई योजना संदर्भात विशेष कॅम्प बँक स्तरावर आयोजित करण्याचे सूचित केले आहे

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचित केल्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील जवळपास 220 शाखांमध्ये कर्ज वाटप कॅम्प सुरू करण्यात आलेला आहे सदरील कॅम्प साठी जिल्ह्यातील उमेद अभियानातील केडर तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी यांच्या मदतीने तीन दिवसीय कॅम्पमध्ये प्रथम दिवसात 20 कोटी रुपयाचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे

व हक्क दर्शक या संस्थेमार्फत 330 प्रपोजल सादर करण्यात आलेले आहे उर्वरित दोन दिवसात जिल्ह्याभरातील महिला बचत गटांना 175 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यास उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात आलेले आहे सदरील नियोजन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुका टीम काम करीत आहे तरी संपूर्ण जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उमेद अभियानातील केडर व कर्मचारी यांच्या सहकार्याने बचत गटांसाठी अल्प व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून घ्यावे व आपले उद्योग व्यवसाय भरभराटीस येण्यासाठी मदत होणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.