डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती व सकल बौद्ध समाज बांधवांतर्फे आयुक्त यांच्याकडे धडक मोर्चा.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती व सकल बौद्ध समाज बांधवांतर्फे आज पुन्हा एकदा जळगाव महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे धडक मोर्चा नेण्यात आला होता .विषय होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेशन येथील पुतळ्याचं सुशोभीकरण करणे तसेच फोल्डिंग फोल्डिंग जिना बसवण्याबाबत. गेल्या पंधरा दिवसापूर्वी समितीतर्फे आयुक्तांना निवेदन दिले गेले होते परंतु महानगरपालिकेतर्फे कोणतंही पाऊल उचललं गेलं नसल्याकारणाने आज समितीतर्फे धडक मोर्चा काढून आयुक्तांना अल्टिमेटम देण्यात आले.

येणाऱ्या पाच एप्रिल पर्यंत सुशोभीकरण तसेच फोल्डिंग जिना बसवून नाही मिळाला तर महानगरपालिकेच्या बाहेर तीव्र आंदोलन तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला म्हणून समितीतर्फे याचिका दाखल केली जाईल . त्यानिमित्त प्रशासक तथा आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सात तारखेच्या आत सुशोभीकरण तसेच फोल्डिंग जिना बसवण्यात येईल अशा प्रकारे आश्वासित केलं तसेच अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

त्या निमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे माझी अध्यक्ष सतीश गायकवाड उपाध्यक्ष भारती रंधे उपाध्यक्ष मोनू अडकमोल कार्याध्यक्ष चंद्रमणी मोरे खजिनदार सचिन सरकटे सहसचिव त्रुशाल सोनवणे सचिव नीलू ताई इंगळे सदस्य संगीता मोरे रिटा तायडे प्राजक्ता तायडे अभिजीत रंधे प्रतिभा शिरसाठ मिलिंद निकम हरिश्चंद्र सोनवणे सर मंगल शिरसाठ निलेश परदेशी इस्माईल खाटीक राजू डोंगरे अनिल पेंढारकर बबलू पेंढारकर चंद्रकला पेंढारकर पिंकी पेंढारकर मेघा सोनवणे नंदा सोनवणे माया निकम राजू बाविस्कर सोनू निकम अजय पेंढारकर बुद्धम बाविस्कर संदीप वाघ तसेच समाज बांधव उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.