उद्योगनगरीत २६ बोगस डॉक्टरांचा महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला असून यापैकी १८ बोगस डॉक्टरवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.उदयोगनगरी म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात २६ बोगस डॉक्टरांचा महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला असून यापैकी १८ बोगस डॉक्टरवर उल्हासनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, यांनी दिली आहे विशेष म्हणजे गुन्हा दाखल असलेल्या बोगस डॉक्टर पैकी सर्वाधिक पर राज्यातील असल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयात तक्रारदारांनी केल्या होत्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकुण २६ डॉक्टरांची यादी प्राप्त झालेली असून त्यांचेवर प्राथमिक कार्यवाही करणेकरीता प्रथम धडक मोहिम राबविण्यात आली होती सदर मोहिमे अंतर्गत आढळून आलेले बोगस प्रमाणपत्र असलेल्या डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त तथा प्रशासक यांचेमार्फत निर्देश देण्यात आलेले होते.











