नागपूरच्या भालदारपुऱ्यात ओल्यासोबत सुकंही जळालं! दशक्रियेसाठी आलेल्या शेख कुटुंबाने मोजली मोठी किंमत.

नागपूरच्या महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या भागांमध्ये गेल्या आठवड्यात दंगल उसळली होती. यामध्ये जमावाने पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली होती.नागपूरमध्ये हिंसाचार घडवणाऱ्या गटाने फक्त विरुद्ध गटाचेच नुकसान केले असे नाही तर त्यांनी आपल्या स्वकीयांचे देखील मोठे नुकसान केले. नागपूरचा भालदारपुरा हा परिसर हिंसाचाराचे केंद्रस्थान होता. हिंसाचारादरम्यान पोलिसांवर जे हल्ले झाले ते देखील याच भागात झाले होते. दंगा करुन दंगेखोर तर पळून गेले, मात्र हिंसा नियंत्रणात आणतांना पोलिसांच्या रोषाचा सामना भालदारपुरा भागातील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागला.25 वर्षीय बुशरा शेख हिच्या वडिलांचे शमीम शेखचे  हिंसाचाराच्या 10 दिवसाआधी निधन झाले होते . मुस्लिम परंपरेनुसार 17 मार्चला दशक्रियेचा कार्यक्रम होता. दशक्रिया आटपून पाहुणे बऱ्यापैकी घरी परत जात होते. काही मोजके पाहुणे सायंकाळी निघण्याच्या तयारीत होते तितक्यात भालदारपुरा परिसरात हिंसाचार सुरु झाला. त्यामुळे पाहुणे घरी अडकले.

नागपूरच्या हिंसाचार सहभागी झालेले तरुण हे बऱ्यापैकी उत्तर नागपूर, पूर्वसह वेगवेगळ्या भागातून शिवाजी पुतळा चौकात दंगल घडवण्यासाठी आले होते. दंगलखोरांनी मोठ्या प्रमाणातजाळपोळ केल्या नंतर पोलिसांनी हिंसा थांबवण्यासाठी बळाचा वापर करायला सुरुवात केली . त्यामुळे दंगलखोरांनी पसार व्हायला सुरुवात केली. मात्र, परिस्थितीच अशी होती की हिंसा नियंत्रणात आणतांना पोलिसांनी अटक सत्र सुरू केले. मग हातात सापडेल त्यांना पोलिसांनी उचलले असा दावा बुशरा शेख हिने केला. यात तिच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लावली असे तिचे म्हणणे आहे. बुशराच्या  म्हणण्यानुसार वडिलांच्या दुःखातून अजून बाहेर निघालोच नाही तर पोलीस माझ्या दोन भावासह सात नातेवाईकांना उचलून घेऊन गेले.

त्यांचा दोष इतकाच होता की हिंसेच्या दिवशी ते दशक्रिया कार्यक्रमानिमित्त आले होते, दंगल सुरु होती त्यावेळी दोघेही माझ्या घरी होते.हिंसेनंतर जखमी पोलिसांचा रोष स्थानिकांवर उफाळून येणे साहजिक आहे असे बुशरा शेखला देखील वाटते. मात्र, दंगलखोर पळून गेले असताना त्यांना सोडून काही स्थानिक निर्दोषांना उचलून अटक झाली. त्यामुळे अटकेत असलेले माझे भाऊ, नातेवाईक हिंसेत सहभागी होते कि नाही हे तपासणे गरजेचे  नाही का ? असा बुशरा शेखचा पोलिसांना प्रश्न आहे. माझे भाऊ हिंसेत सहभागी असेल तर कारवाई व्हायला हवी, त्याचे आम्ही समर्थन करतो, मात्र, आम्ही पण भारतचे नागरिक आहे, संविधान आमच्यासाठी पण आहे ना ? त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला हवा अशी मागणी बुशरा शेखने सरकारकडे केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.