जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळातील विद्यार्थी प्रथमच विधान भवनाला भेट देण्यासाठी रवाना.

जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळातील विद्यार्थी प्रथमच विधान भवनाला भेट देण्यासाठी रवाना. जळगाव दि. 26 मार्च – इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमच विधानभवनाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. या अभ्यास भेटीत विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. नाशिक विभागातील तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळावी यासाठी ही अभ्यास भेट आहे.

यासाठी जळगाव विभागाचे 14 विद्यार्थी व 1 शिक्षिका आणि 1 शिक्षक आणि 41 विद्यार्थी यी अभ्यास भेटीसाठी रवाना झाले आहे. यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधानसभेचे कामकाज पाहता येणार आहे. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाऊन राष्ट्राची प्रगती साधावी, हा शासनाचा यामागील उद्देश आहे. या अभ्यास भेट दरम्यान विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला, तारांगण या ठिकाणांना देखील विद्यार्थी भेट देतील असा मानस आहे.

शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार खुले करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. या अभ्यास भेटीसाठी सचिव विनोद सिंघल ,संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, नाशिक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक भगवान वीर, सहायक संचालक योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.