अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण; 27 मार्च रोजी मुलाखती.

अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण; 27 मार्च रोजी मुलाखती
जळगाव  – रावेरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना 1 एप्रिल 2025 ते 15 जुलै 2025 या कालावधीत स्पर्धा परिक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याकरीता २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाद्वारे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे ‌. प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक) महाराष्ट्राचा रहिवासी असावा.शालांत परीक्षा (इयत्ता १० वी) उत्तीर्ण असावा. वय १८ वर्ष पूर्ण असावे. वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकडून विविध शासकीय/ निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची पूर्वतयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना उपस्थितीनुसार दरमहा रूपये १००० विद्यावेतन व प्रशिक्षण पूर्ण केल्यावर ४ पुस्तकांचा मोफत संच प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, १० वी, १२ वी व पदवी गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला या कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रतीसह स्व:खर्चाने उपस्थित रहावे.अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २. शनी मंदीरामागे स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर किंवा संपर्कासाठी दूरध्वनी ०२५८४-२५१९०६, या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.