शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग, वाट अडवून चिठ्ठी देण्याचा प्रयत्न, नकार देताच… नाशकातील संतापजनक प्रकार.

नाशकात एका विद्यार्थिनीला वाटेत अडवून तिची छेड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनी आधी तिचा पाठलाग केला मग तिला अडवल्याची माहिती आहे.शाळेतून घराकडे पायी जाणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शालिमार परिसरातील नेहरू उद्यानाजवळ घडला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून रिक्षातून आलेल्या दोन अज्ञात संशयितांविरुद्ध भद्रकाली पोलिसांत विनयभंगासह ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सोमवारी (दि. २४) सीबीएस परिसरातील शाळेतून चुलत काकाच्या घराकडे पायी जाणाऱ्या विद्यार्थिनीचा एका रिक्षाने पाठलाग केला. नेहरू उद्यानाजवळ रिक्षाने तिचा रस्ता अडवून रिक्षातील दोघांपैकी एकाने तिच्याकडून पेन घेत मोबाइल नंबर असलेली चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थिनीने चिठ्ठी घेण्यास नकार दिल्याने रिक्षातील दुसऱ्या संशयिताने त्याच्याकडील मोबाइलमध्ये पीडितेचा फोटो क्लिक केला.

घडलेला प्रकार पीडितेने पालकांना सांगितल्यानंतर पोलिसांत फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, सीसीटीव्हीवरून संशयितांची ओळख पटविण्यात येत आहे.मालवाहू पिकअप अडवून चाकूचा धाक दाखवत टोळक्याने चालकास लुटल्याची घटना अमरधामरोड भागात घडली. या घटनेत भामट्यांनी अडीच हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सुरमा उर्फ शहारूख शहा (रा.नानावली), साबीर शहा (रा.सादिकनगर,वडाळा), आवेश खान व असलम खान (रा.दोघे नानावली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत भूषण सुरेश चौधरी (४४ रा. रविवार कारंजा ) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांच्या अटकेने अनेक लुटमारीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.नाशिकरोड : जयभवानी रोडवरील नंदनवन कॉलनीतील घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने व ७५ हजाराची रोकड असा एकूण सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. जयभवानी रोड, नंदनवन कॉलनीत राहणारे वेदप्रकाश वर्मा हे १२ मार्चला कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ते शनिवारी (दि.२२) परतले असता त्यांना मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.