नव्या विहिरीचं खोदकाम जीवावर बेतलं, ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भयंकर घडलं; सारं गाव हळहळलं.

नव्या विहिरीचं खोदकाम सुरू असताना दोन तरुणांसोबत अतिशय भयंकर घटना घडली. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना भीषण अपघात झाला. या अपघातात नव्या विहिरीचं काम करणाऱ्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विहिरीच्या खोदकामावेळी ट्रॅक्टरचा अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर विहिरीत २० फूट खाली कोसळला. या ट्रॅक्टर खाली दबून दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना नवापूर तालुक्यातील गताडी शिवारातील धरणाजवळ असलेल्या शेतात घडली.

नवापूर तालुक्यातील गताडी शिवारात असलेल्या धरणाजवळ नवी विहीर खोदण्याचं काम सुरू होतं. रोजण्या गावीत या व्यक्तीच्या शेतात ही नवी विहीर खोदण्याचं काम सुरू होतं. या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते. सोमवारी, २४ मार्च रोजी रात्री विश्वास जोगु गावीत (वय २३) रा. वागदी, ता. नवापूर हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरने (क्र. एम. एच .18 झेड 7160) काम करत होता. यावेळी त्याच्या सोबत त्याचा मित्र कृष्णा काशीराम गावीत (वय ३३) रा. हळदाणी ता. नवापुर हे देखील होते.दरम्यान, २४ मार्च रोजी रात्रीच्या वेळी विहीरी जवळून ट्रॅक्टर घेऊन जात असताना विश्वास गावित यांचा अंदाज चुकल्याने दोघांसह ट्रॅक्टर २० फूट खोल विहिरीत कोसळला. त्याच ट्रॅक्टर खाली दबून विश्वास गावित आणि कृष्णा गावित या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रात्री तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात मोठ्या जेसीबीच्या साहाय्याने विहीरीत पडलेला ट्रॅक्टर बाजूला करुन दोन्ही मृत तरुणांचे मृतदेह बाहेर काढून विसरवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची माहिती मृत तरुणांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी एकच टाहो फोडला. तरुण मुलांच्या अशाप्रकारे झालेल्या निधनाने संपूर्ण गाव हळहळलं. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.