नंदुरबार – आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन.नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसेविश्व आदिवासी दिवसाच्या पूर्वसंध्येला नंदुरबार शहरातून आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी संस्कृती दर्शन घडवणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला राज्यभरातील विविध भागातून आलेल्या आदिवासी कलाकारांनी सहभाग नोंदविला असून वेगवेगळ्या भागातील आदिवासी परंपरांचे दर्शन या रॅलीतून नंदुरबारकरांना घेता आले. आदिवासी विकास विभागाच्या वतीने नंदुरबार येथे तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी राज्यभरातील आदिवासी भागातील कलाकार आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी आले असून विविध भागातील नृत्य आविष्कार या ठिकाणी सादर करण्यात आलेया रॅलीचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार डॉ.हिना गावित ,जिल्हा परिषद डॉ.सुप्रिया गावित यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी घडविले या रॅलीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांचा उत्साह पाहण्यासारखा होता राज्यातील आदिवासी संस्कृती येणाऱ्या काळात टिकून राहण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…