महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो या प्रार्थनेसह महाआरतीजागृत स्वयंभू महादेव मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम जळगाव -श्रावण महिना हा महादेवाला प्रसन्न करण्याचा पवित्र महिना असल्याने महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो,सर्वांना सुख समृद्धी लाभो या प्रार्थनेसह तीन जोडप्यांच्या हस्ते दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी 7.30 वाजता महाआरती करण्यात आली.सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे जागृत स्वयंभू महादेव मंदिरात नंदिदेवता व महादेवाला पहाटे 5.30 वाजता मधुकर ठाकरे आणि नरेश बागडे यांच्या हस्ते जलअभिषेक करण्यात आले.त्यानंतर महिंद्र साळुंखे -सुजाता साळुंखे, शाम राठोड-निलीमा राठोड, दिनेश राजपुत -वैशाली राजपुत तसेच डॉ.शाम बाविस्कर यांच्या हस्ते नंदि देवता व जागृत स्वयंभू शिवलिंगाला दुग्ध अभिषेक करून महाआरती करण्यात आली.महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना आरतीचे मानकरींनी केली.त्यानंतर शिवलिंगाला बेलपत्रने सजविण्यात आले होते.पहाटेपासून शिवभक्तांची रिघ सुरू होती.यावेळी अजय राणा, ममता राणा, नारायण येवले, विजय भावसार शिवभक्त उपस्थित होते.शिवभक्तांनी केळीचा प्रसादाचा लाभ घेतला.यशस्वीतेसाठी सोनी नगर, प्रल्हाद नगर, गणपती नगर, ओंकार पार्क, श्रीराम नगर, बाबुराव नगर परीसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.
हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…