रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगारा कडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंती काडतूस एकूण ५१,०००/- रु किंमतीचामुद्देमाल

.

रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगारा कडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंती काडतूस एकूण ५१,०००/- रु किंमतीचामुद्देमाल हस्तगत करण्यात आल..  दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर दिनांक १०/०८/२०२४ रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. डॉ. विशाल जयस्वाल यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेकॉ रविंद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकॉ विकार शेख अशांना कॅबिनमध्ये बोलावून कळविले मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील हॉटेल जय पॅलेस समोर एक इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी वर प्रमाणे पोलीस स्टॉफ रवाना होवून संशयीत इसमास सापळा रचून ताब्यात घेतले सदर इसमास ताब्यात घेवून त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीच्या ०२ रिव्हाल्वर व ०२ जिवंत काडतूस असा एकुण ५१,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यावरुन नामे तोफसिंग चतरसिंग चावला वय २७ वर्षे रा.धसली ता. झिरण्या जि. खरगोण (मध्य प्रदेश) यास ताब्यात घेवुन त्यास रावेर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही कामी घेवून आलो पोकों/ २०५९ महेश मोगरे यांच्या फिर्याद वरुन रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन ३७९/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३,२५ प्रमाणे सहकलम मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लघन कलम १३५ प्रमाणे व भारतीय न्यास संहिता कलम २२३ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशनाखाली पोउनि तुषार पाटील हे करीत आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो, मा.श्री अशोख नखाते साहेब, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोलीस निरीक्षक डॉ.श्री विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेको रविंद्र वंजारी सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकों विकार शेख, पोकों/ अतुल गाडीलोहार यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द