खान्देशात आजपासुन कानबाई उत्सवाला सुरुवात.

खान्देशात आजपासुन कानबाई उत्सवाला सुरुवात.

भडगांव / पाचोरा तालुका प्रतिनीधी : यशकुमार पाटील

भडगांव : खान्देशातील प्रसिध्द असलेला कानबाई माता उत्सव हा दरवर्षी श्रावण महिण्यात मोठ्या भक्तिभावाने साजारा केला जातो. खान्देशात कानबाई उत्सव रोट म्हणुन प्रसिध्द आहे. हा कानबाई उत्सव या वर्षी १० ऑगस्ट पासुन सुरुवात होत असुन हा उत्सव तीन दिवस साजरा करण्यात येतो. श्रावण पंचमी अर्थात नागपंचमी नंतर येणारा पहिल्या शनिवारी भाजी भाकरीचे रोट, रविवारी कानबाई मातेची विधिवत स्थापना चौरंग पाटावर, कळस, नारळ, खण तसेच इतर पूजा साहित्य ठेवून चारही बाजूने केळीचे खांब व रांगोळी काढून रंगेबीरंगी लाईट, समई लाऊन सुशोभीकरण करण्यात येते. भाऊबंदकी व कुळातील व्यक्ती सपत्नीक पूजा करून पुरणपोळीच्या नैवेद्य दाखवला जातो. हा प्रसाद घेण्यासाठी भाऊबंदकी तसेच बाहेरगावी राहणारे सुध्दा मुळ गावी येतात. रात्रीच्या वेळी जागरण केले जाते महिलांकडुन गीते, ओव्या, भजन, गौळण तसेच पुरुष मंडळी देखील पारंपारीक वह्या, कानबाई मातेची गाणी म्हणतात. मनोरत पुर्ण होण्यासाठी विविध प्रकारचे मागणे माघुन नवसाची पुर्तता महिला वर्गाकडून होताना दिसते. तसेच सोमवारी वाजत गाजत मिरवणूक काढून कानबाईचे नदीपात्रावर विसर्जन करण्यात येते.

  • Related Posts

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न केले होते. ती उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात तिच्या सासरच्यांसोबत राहत आहे आणि तिने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला…

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack)…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?

    हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?

    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट.

    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट.