यावल महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात साजरा.

यावल महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी (यावल) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑगस्ट आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. संजय पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून यावल शहराचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी सध्या स्पर्धेचे युग आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वाचन, चिंतन, मनन, व स्व:ताचा आत्मविश्वास यावर लक्ष केंद्रित करून अभ्यासाची गोडी निर्माण करावी परिश्रम ही यशाची जननी आहे अवांतर पुस्तक वाचनाबरोबर दूरदर्शन, रेडिओ, वर्तमानपत्रातील बातम्या व यशस्वी अधिकाऱ्यांची युट्युबवरील भाषण ऐकून आदर्श घ्यावा व नोकरी मिळवण्याची स्वप्न पहावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे दुसरे वक्ते प्रा. शेरसिंग पाडवी यांनी आदिवासी दिनामागील पार्श्वभूमी, संस्कृती, रितीरिवाज तसेच क्रांती दिनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी नेहमीच शासनाच्या वेगवेगळ्या योजना सवलती व त्यामागील संधी यांचा फायदा घेऊन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. सी. टी. वसावे यांनी केले तर आभार प्रा. सुभाष कामडी यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला श्री.अनिल सांळुखे ( पोलिस यावल) डॉ.हेमंत भंगाळे, डॉ. आर. डी. पवार प्रा. मनोज पाटील प्रा. चिंतामण पाटील, श्री.अजय पाडवी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. राजेंद्र थिगळे, प्रा. नंदकिशोर बोदडे, संतोष ठाकूर डॉ. संतोष जाधव, प्रा. प्रतिभा रावते, डॉ. वैशाली कोष्टी, डॉ. निर्मला पवार, प्रा.निकिता पाटील, प्रा.नागेश्वर जगताप, प्रा. दानेश पटेल मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम याबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    ठाकरेंच्या शिवसेनेतेली वाद विकोपाला, चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे, दोन मोठ्या नेत्यांमध्ये संघर्ष.

    छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. खैरे यांनी आपण दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार…

    दोघे भाऊ एकत्र गेले, एक परत आलाच नाही, दुसरा गंभीर; नाशिकच्या हॉटेलमध्ये भयंकर घडलं.

    नाशिकमध्ये दोन भावांवर मद्यपींकडून हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे.राज्यभरात मारहाण, चोरीच्या, हत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ठाकरेंच्या शिवसेनेतेली वाद विकोपाला, चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे, दोन मोठ्या नेत्यांमध्ये संघर्ष.

    ठाकरेंच्या शिवसेनेतेली वाद विकोपाला, चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे, दोन मोठ्या नेत्यांमध्ये संघर्ष.

    दोघे भाऊ एकत्र गेले, एक परत आलाच नाही, दुसरा गंभीर; नाशिकच्या हॉटेलमध्ये भयंकर घडलं.

    दोघे भाऊ एकत्र गेले, एक परत आलाच नाही, दुसरा गंभीर; नाशिकच्या हॉटेलमध्ये भयंकर घडलं.

    सत्यशोधक समाज संघाच्या वतीने ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !…

    सत्यशोधक समाज संघाच्या वतीने ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !…

    विठुरायाच्या दर्शनासाठी गेला पण काळाने गाठले; चंद्रभागेत बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा.

    विठुरायाच्या दर्शनासाठी गेला पण काळाने गाठले; चंद्रभागेत बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा.