ऐनपूर येथील प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न चांगल्या संगोपनासाठी आनंदी वातावरण आवश्यक–एन व्ही पाटील
रावेर प्रतिनिधी:-प्रदीप महाराज रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदीरात “शिक्षक-पालक” सहविचार सभा संस्थेचे संचालक एन.व्ही.पाटील यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली.व्यासपिठावर शाळेचे व्यवस्थापक आर .टी.महाजन,मुख्याध्यापक अक्षय पाटील,पालक अतिकेश पाटील,किशोर भवरे,सुशील पाटील,बळीराम गिल्ले आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी तसेच त्यांच्या अभ्यासक्रमा बाबत व शालेय अडीअडचणी वर चर्चा करण्यात आली.नंतर पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली.प्रास्ताविक मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी केले व सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन पालकांच्या हस्ते करण्यात आले.स्वागत व सभेतील विषयांची माहिती अश्विनी चौधरी यांनी दिली.तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या दैनंदिन सूचना निकिता चौधरी यांनी दिल्यात.शिक्षक,पालक व मातांनी शैक्षणिक बाबीवर सविस्तर चर्चा केली.मुलांसमोर चांगला आदर्श ठेवणे ही पालकांची जबाबदारी असुन कुटुंबातील तणाव,राग,भिति,चिंता असे वातावरण मुलांसाठी घातक असते. मुलांवर उगाच निर्बध लावु नका. चांगल्या संगोपनासाठी आनंदी वातावरण आवश्यक असल्याचे मत एन.व्ही.पाटील सर यांनी अध्यक्षीय विचारा प्रसंगी व्यक्त केले.संचालन जयश्री सराफ यांनी तर आभार अनिता महाजन यांनी मानले.व सभेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सभेस पालक माता मोठ्या संख्येने उपस्थित होते.