रावेर ता.प्रतिनिधी:-प्रदीप महाराजआज दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी सत्यसाई सेवा संघटना जळगाव आणि तुलसी हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने सत्यसाई सेवा समिती बोरखेडा रावेर मोरगाव आणि शिंदखेडा यांनी संयुक्तपणे मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बोरखेडा येथे केले होते. त्यात एकूण 126 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 61पेशंट यांना मोतीबिंदू ऑपरेशन साठी रेफर करण्यात आले.त्यापैकी 24 पेशंट आज ऑपरेशन साठी तुलसीआय हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात आले. आणि उरलेले 37 पेशंट उद्या ऑपरेशन साठी तुलसी आय हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात येणार आहेत.
महानारायण सेवा ही करण्यात आली. त्यात सकाळी सर्व पेशंट, नातेवाईक , सेवादल व सर्वांना चहा ,नाश्ता आणि तपासणी नंतर सर्वांना जेवण देण्यात आले. तसेच प्रवासात सर्व पेशंट यांना पाणी बाॅटल व बिस्किटे व चहा देण्यात आला. या आय कॅम्प साठी सत्य साई सेवा संघटना जळगावचे . नितीन जैन राज्य नारायण सेवा प्रमुख सुनील पाटील जिल्हा बालविकास प्रमुख विजय गोसावी जिल्हा अध्यात्मिक प्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा युवा तथा मीडिया प्रमुख पंकज पाटील, बोरखेडा समितीचे शांताराम पाटील, बोरखेड्याचे पोलीस पाटील अरुण पाटील व समिती नितीन पाटील ,रावेर समिती .लिलाधर महाजन ,मोरगाव समिती अरुण चौधरी व युवा प्रमुख वैभव चौधरी ,शिंदखेडा युवाप्रमुख चेतन पाटील सर्व समितीचे ,तुलसी आय हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीकांत सुरळकर आणि त्यांची सर्व टीम तसेच सर्व समितीचे सदस्य सत्यसाई बालविकास चे विद्यार्थी व पालक व सर्व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…
बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…
