तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

 सत्यसाई सेवा संघटना जळगाव अंतर्गत सत्यसाई सेवा समिती बोरखेडा येथे तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजनरावेर ता.प्रतिनिधी:-प्रदीप महाराजआज दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी सत्यसाई सेवा संघटना जळगाव आणि तुलसी हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने  सत्यसाई सेवा समिती बोरखेडा रावेर मोरगाव आणि शिंदखेडा यांनी संयुक्तपणे मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बोरखेडा येथे केले होते. त्यात एकूण 126 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 61पेशंट यांना मोतीबिंदू ऑपरेशन साठी रेफर करण्यात आले.त्यापैकी 24 पेशंट आज ऑपरेशन साठी तुलसीआय हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात आले. आणि उरलेले 37 पेशंट उद्या ऑपरेशन साठी तुलसी आय हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात येणार आहेत.महानारायण सेवा ही करण्यात आली. त्यात सकाळी सर्व पेशंट, नातेवाईक , सेवादल व सर्वांना चहा ,नाश्ता आणि तपासणी नंतर सर्वांना जेवण देण्यात आले. तसेच प्रवासात सर्व पेशंट यांना पाणी बाॅटल व बिस्किटे व चहा देण्यात आला. या आय कॅम्प साठी  सत्य साई सेवा संघटना जळगावचे  . नितीन जैन राज्य नारायण सेवा प्रमुख  सुनील पाटील जिल्हा बालविकास प्रमुख  विजय गोसावी जिल्हा अध्यात्मिक प्रमुख  प्रकाश पाटील, जिल्हा युवा तथा मीडिया प्रमुख पंकज पाटील, बोरखेडा समितीचे शांताराम पाटील, बोरखेड्याचे पोलीस पाटील अरुण पाटील व समिती  नितीन पाटील ,रावेर समिती .लिलाधर महाजन ,मोरगाव समिती   अरुण चौधरी व युवा प्रमुख वैभव चौधरी ,शिंदखेडा युवाप्रमुख चेतन पाटील सर्व समितीचे  ,तुलसी आय हॉस्पिटलचे डॉक्टर  श्रीकांत सुरळकर आणि त्यांची सर्व टीम तसेच सर्व समितीचे सदस्य सत्यसाई बालविकास चे विद्यार्थी व पालक व सर्व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.

  • Related Posts

    ४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतुससह आरोपी अटकेत.

    पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास चार गावठी पिस्टल व विस जिवंत काडतूस विना परवाना घेऊन येताना मध्यप्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलीसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत एक लाख सत्तर हजार…

    राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार.

    राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या नि्र्णयानुसार सद्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतुससह आरोपी अटकेत.

    ४ गावठी पिस्टल व २० जिवंत काडतुससह आरोपी अटकेत.

    राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार.

    राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार.

    आम्ही अधिकाऱ्यांना हप्ता देतो लाकूडतोड? एरंडोल तालुक्यात अवैध रीतीने वृक्ष तोड थांबणार तरी कधी,

    आम्ही अधिकाऱ्यांना हप्ता देतो लाकूडतोड? एरंडोल तालुक्यात अवैध रीतीने वृक्ष तोड थांबणार तरी कधी,

    शासकीय कामांसाठी नागरिकांची भटकंती होणार नाही याची दक्षता बाळगुन कामे करा – आमदार अमोल पाटील.

    शासकीय कामांसाठी नागरिकांची भटकंती होणार नाही याची दक्षता बाळगुन कामे करा – आमदार अमोल पाटील.

    वर्षभरापासून पत्नीपासून विभक्त, कोर्टात घटस्फोटाची केस; वकिलाने केली आयुष्याची अखेर.

    वर्षभरापासून पत्नीपासून विभक्त, कोर्टात घटस्फोटाची केस; वकिलाने केली आयुष्याची अखेर.

    छत्रपती संभाजीनगर महापालिका उभारणार विशेष मुलांसाठी शाळा आणि संशोधन केंद्र; उपचार केंद्राचीही सोय असणार.

    छत्रपती संभाजीनगर महापालिका उभारणार विशेष मुलांसाठी शाळा आणि संशोधन केंद्र; उपचार केंद्राचीही सोय असणार.