गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी संतप्त : आमरण उपोषणाचा इशारा

गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी संतप्त : आमरण उपोषणाचा इशारा

भडगाव शहरातील जुना पिंपळगाव रस्त्यावरून घोडदेबाबा देवस्थाना जवळुन गिरणा नदीच्या पात्रातून दररोज रात्री ५० ते ६० ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक होते. या वाळूच्या ट्रॅक्टरमुळे जुना पिंपळगाव रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, घोडदेबाबा देवस्थाना जवळ गिरणा नदीच्या पात्रातून दररोज रात्री सुमारे ५० ते ६० ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक होते. या ट्रॅक्टरच्या वापरांमुळे जुना पिंपळगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच नवनाथ बाबा मंदिरावर आणि घोडदे बाबा देवस्थानावर ही भाविकांसह शेतकरी याच रस्त्याने वापर करत असतात. हा रस्ता वाळू माफियांनी पूर्ण खराब केला आहे. त्यात शेतकऱ्यांना रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वाळू चोरट्यांना बराच वेळा हकलण्याचा प्रयत्न केला परंतु वाळू चोरांनी दादागिरी केल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. ही वाळू चोरी थांबावी आणि वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सात दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर दि. १२ ऑगस्ट पासून भडगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संजय परदेशी, सुनील पाटील, मुनगाहीद खॉ. पठाण, इंदल परदेशी, फिरोजखान मजिद खान तौसीफ खान, मुश्ताक अहमद, शेख परवेज शेख अहमद, अवधूत महाजन, हिरामण पाटील, प्रकाश सूर्यवंशी, कैलास परदेशी, सौरभ देशमुख, अविनाश अहिरे, शेख अल्ताफ शेख उमर, इखान खान युसूफ खान, अभय हरी परदेशी, अशोक आनंदा सूर्यवंशी, समीर खान जहाँगीर खान, विजय एकनाथ शिनकर, सुरेश तोताराम पाटील, नितीन कदम,भगवान महाजन्, किशोर महाजन, गोरख दगा पाटील, संतोषा लक्ष्मण पाटील, आसिफ शेख, शेखा अहमद शेख अमीर उपस्थित होते.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.