१४ लाखांचा मुद्देमाल जप्त चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल.

१४ लाखांचा मुद्देमाल जप्त चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल.

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी. अवैधरित्या गाईंची वाहतूक करणाऱ्या वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाच जणांवर पहाटे चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. यात दोन्ही मिळून १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पाच जणांविरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.सविस्तर वृत्त असे कि, सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अमोल शिवाजी सुरळकर (वय २२), गणेश रमेश राऊत (वय २६) व आकाश दादाराव राऊत (वय २१) व भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथील योगेश मिरचंद रिसवाल (वय २५) हे चौघे ३१ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास दोन बोलेरो चारचाकी गाडी (एमएच १९सीवाय ६३०७ व एमएच- २०, इएल ८५५६) मधून अवैधरित्या १ लाख ८० हजारांच्या ६ जर्सी गाईं व १० हजाराचे दोन वासरू घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी शहरातील गोल मंदिराजवळ पकडले. यात गाडीसह ८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पो.कॉ. अक्षय पाटील यांच्या फिर्यादीवरून चौघाविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या घटनेत ३१ रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ बोलेरो चारचाकी (एमएच- २०, जिसी- ७९०८) तून सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अभिषेक कौतिक तायडे (वय २३) हा अवैधरित्या ९० हजारांच्या ३ जर्सी गाई व ५ हजाराचे एक वासरू घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले. यात गाडीसह लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पो.कॉ. योगेश बोडके डके यांच्या फिर्यादीवरून अभिषेक तायडे याच्याविरोधात शहर पोलिसात गुना दाखल झाला आहे. तपास स.फी. जितेंद्र सोनवणे करत आहेत. दोन्ही घटनेत पोलिसांनी १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन यातील पाच्चती आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.