गढूळ पाणी प्रश्नी धरणगावातील महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार..

गढूळ पाणी प्रश्नी धरणगावातील महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार.. ‘पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’ अशी ऑफर मोर्चेकरांकडून करण्यात आली.

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर,

धरणगाव : पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणाबाबत संतापलेल्या नागरिकांनी आज रोजी मातीमिश्रित, चिखलयुक्त पिवळसर गढूळ पाण्याच्या बॉटल सोबत घेत नगरपरिषदेवर मोर्चा काढत प्रशासनाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. मागील दोन वर्षात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असताना देखील धरणगाव शहरातील पाणीटंचाई प्रश्न कायम आहे. मुबलक पाणी उपलब्ध असताना देखील पाणीपुरवठ्याच्या योग्य नियोजनाअभावी नागरिकांना आठ ते दहा दिवसांत, वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. शहरातील विविध पक्षांकडून व नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही पाणीप्रश्न तडीस जात नसल्याने आज रोजी संतप्त नागरिकांनी एल्गार करीत धरणगाव नगरपरिषदेवर धडक दिली. महिला पुरुष तसेच आबालुद्ध नगरपालिकेवर धडकले.

मोर्चा नगरपालिकेवर धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत, महिलांनी गढूळ पाण्याच्या बॉटल पाणी पुरवठा अभियंता व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दाखवीत हे पाणी आपण पिऊन दाखवा लाखाचे बक्षीस देवू अशी ऑफर करीत जाब विचारला. शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे अशी एक मुखी मागणी आक्रमक मोर्चेकरी महिला, पुरुष व आबालवृद्धांनी केली. शहरात विविध विकास कामांचा धडाका सुरु असला तरी पाणी समस्या कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ, चिखलयुक्त पिवळसर होत आहे. याचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांना पोटदुखी, काविळ, चक्कर येणे यासारखी आजारांचा सामना करावा लागतो. शहरापासून अवघ्या ८ ते १० किमी अंतरावर जीवनवाहिनी तापीनदी, अंजनीनदी असतांना शहरवासीयांना पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने अनेकांना अधिकचे पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. घरकर, पाणीकर, वृक्षकर, कचराकर, शिक्षणकर यांसह विविध कर नियमित भरत असल्याने नागरिकांना वेळेवर स्वच्छ पाण्याची सुविधा नगरपरिषद प्रशासनाने पुरविणे गरजेचे आहे. यावेळी कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी सो, पाणी पुरवठा अभियंता .अनुराधा चव्हाण, करनिरीक्षक प्रणव पाटील सो, यांनी मोर्चेकरांच्या समस्या जाणून घेत लवकरच निवारण करण्याचे आश्वासन दिले. पाणी पुरवठा अभियंता सौ.चव्हाण यांनी दूषित व गढूळ पाणी आलेल्या प्रभागात जाऊन चौकशी केली असता शहरात नवीन पाइपलाइन चे काम सुरू असल्याने तांत्रिक अडचणी आल्याचे सांगितले.

  • Related Posts

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर…

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न