भजनासाठी निघालेल्या अर्टीगाचा भीषण अपघात, एक युवक ठार तर चार जण जखमी, महाशिवरात्रीला आक्रित घडलं.

महाशिवरात्री निमित्त भजनाला निघालेल्या पाच जणांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. हातातोंडाशी आलेला घास काळाने हिरावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तर परिसरात शोकाकुल वातावरण असून हळहळ व्यक्त केली जात आहे.महाशिवरात्री निमित्त भजनासाठी पहाटे अर्टीगा गाडीत पाच युवक जात असताना नंदुरबार शहरातील वीर महाराणा प्रताप ते खोडाई देवी मंदिर रस्त्यावर भरधाव वेगातील आर्टिगा गाडी विद्युत खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अपघातात चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत आर्टिगा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाशिवरात्री निमित्त भजनाला निघालेल्या पाच जणांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. हातातोंडाशी आलेला घास काळाने हिरावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तर परिसरात शोकाकुल वातावरण असून हळहळ व्यक्त केली जात आहे.नंदुरबार शहरातील गांधी नगर नजीकच्या मोईजनगरातील हितेश शांतीलाल ईशी हा हर्षल रवींद्र मराठे (वय १८) रा. कुंभारवाडा नंदुरबार, अविनाश युवराज देशमुख रा.बालआमराई, नितेश मनोज पवार रा.गांधीनगर, हितेश शांतीलाल ईशी रा. मोईजनगर नंदुरबार व रोशन संतोष नवसारे यांना आर्टिगा गाडीतून (क्र. एमएच.३९-एजे. ७१५४) ने महाशिवरात्रीनिमित्त भजनासाठी शहरातील जगतापवाडी परिसरात असलेल्या डूबकेश्वर महादेव मंदिरावर जाण्यासाठी घेऊन जात असताना, नंदुरबार शहरातील वीर महाराणा प्रताप पुतळा ते खोडाई देवी मंदिर रस्त्याने भरधाव वेगाने गाडी चालवीत होता.

त्याचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने खोडाई देवी चौकानजीकच्या विद्युत खांबावर गाडी धडकली.या अपघातात गाडीतील वरील सर्वजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी चार वाजेच्या सुमारास घडला. मोठा आवाज झाल्याने मंदिर परिसरात राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या हर्षल रवींद्र मराठे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रोशन संतोष नवसारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्टिगा चालक हितेश शांतीलाल ईशी याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. घटनेचा तपास सपोनि. विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.