धार्मिक कॉरिडॉर तयार करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, त्र्यंबकेश्वरातील सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय.

नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ मेळ्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आढावा बैठक झाली. त्या वेळी त्यांनी नियोजनासंदर्भात सूचना केल्या‘सिंहस्थ मेळ्यासाठी आलेला भाविक हा नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी अशा धार्मिक स्थळांनाही भेट देण्याच्या अनुषंगाने या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करा,’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ मेळ्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आढावा बैठक झाली. त्या वेळी त्यांनी नियोजनासंदर्भात सूचना केल्या. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी प्रयागराजमधील सोयी-सुविधांचे सादरीकरण केले.

हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी या वेळी दिले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. रामकाल पथचे काम वर्षभरात पूर्ण करून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियोजन; तसेच सर्व्हेलन्ससाठी जास्तीत जास्त ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करावा.

ज्या भागातून जास्त गर्दी होते, त्या रस्त्यांवर गर्दीच्या नियोजनासाठी व भाविकांना वेळ घालविता यावा, यासाठी त्या ठिकाणी डिजिटल कुंभसंदर्भातील प्रदर्शन तयार करावे. सिंहस्थ मेळ्याचा लोगो तयार करण्यासाठी स्पर्धा घ्यावी, अशी सूचना फडणवीस यांनी केल्या आहेत.सिंहस्थासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गांनी भाविक येणार असल्याने रस्ते मार्गाचे बळकटीकरण करण्याच्या सूचना फडणवीस यांनी केल्या आहेत. सिंहस्थ काळात बाहेरील वाहनांना बंदी घालून भाविकांसाठी वाहनतळ ते शहरात प्रवासासाठी ई बसचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी सांगितले.शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, ओझर या विमानतळांवरही प्रवाशांचे नियोजन करावे. शिर्डी विमानतळावर विमाने थांबविण्यासाठी जागा वाढविण्यात यावी, तसेच ओझर विमानतळावरही अधिक विमानांच्या लँडिंगसाठी सोय उपलब्ध करून द्यावी. नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का, याचा विचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.