शर्टाने हात-पाय बांधले, हत्या करुन उसाच्या शेतात पुरलं, सोलापुरात भयंकर घडलं; पोलिसांनी असं उकललं हत्येचं गूढ.

 सोलापुरात वृद्धाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह उसाच्या शेतात पुरण्यात आला होता. या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाभूळगाव येथे एका व्यक्तीचा खून करून त्याचं मृतदेह पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. सुरेश रंजनाथ शिंदें (वय ६८, रा बाभूळगाव, ता बार्शी, जि सोलापूर) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. बार्शी तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आता या गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बाभूळगाव आणि आगळगाव परीसरातील नागरिकांची कसून चौकशी केली असता गुप्त माहितीच्या आधारे शेजारी राहणारा दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि बाभूळगावात सालगडी म्हणून काम करणारा राहूल नागेश गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) या दोघांचा या हत्येत सहभाग असल्याचा संशय बळावला. प्राथमिक चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघा संशयीत आरोपींनी सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम मिळवण्यासाठी कट रचला. त्यानंतर गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ऊसाच्या शेतात पुरला. तांत्रिक तपासातूनही या दोघांचा गुन्ह्यात सहभाग सिद्ध झाला आहे. बार्शी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.सुरेश रंगनाथ शिंदे (वय ६८, रा. बाभूळगाव) हे १७ फेब्रुवारी २०२५ रोजी बार्शी येथून आपल्या गावी जात असताना अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही मागमूस लागला नाही.

अखेर २० फेब्रुवारी रोजी दुपारी बाभूळगाव शिवारातील गट नं. १६५ मध्ये ऊस लागवडीच्या शेतात एका शेतकऱ्याला मानवी पाय दिसला. माहिती मिळताच पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवली. मृतदेहाचे दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते आणि गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या.बार्शी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ खून आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा (गु.र.नं. ५५/२५) दाखल करून तपास सुरू केला. बाभूळगाव आणि आगळगाव परिसरातील नागरिकांची कसून चौकशी केली असता गुप्त माहितीच्या आधारे शेजारी राहणारा दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि बाभूळगावात सालगडी म्हणून काम करणारा राहूल नागेश गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) यांचा सहभाग असल्याचा संशय बळावला. प्राथमिक चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम मिळवण्यासाठी कट रचून त्यांची हत्या केली.दोन्ही संशयीत आरोपींना अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक अभियोक्ता सोनवणे यांनी युक्तिवाद केला. तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याचा तपास बार्शी तालुका पोलिसांनी केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.