देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, तीस वर्षीय आयटी इंजिनीअरचा जागीच अंत.

सातारा जिल्ह्यातील शिराळा येथील बायपासवरील गोरक्षनाथ मंदिर पुलाजवळ दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाची कारला धडक बसली. यात कैलास जागीच ठार झाले तर इतर गंभीर जखमी झाले.देवदर्शनाला जाताना एका आयटी इंजिनीअरचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रूक बेलवाडी तांड्यावरचे रहिवासी कैलास ताराचंद चव्हाण (३०) यांचा सातारा जिल्ह्यातील शिराळा येथे देवदर्शनाला जाताना अपघाती मृत्यू झाला. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.

आयटी इंजिनीअर असलेले कैलास चव्हाण हे पत्नीसह आळंदी येथे वास्तव्यास होते. रत्नागिरी जिल्ह्यातील नानीज येथे पत्नी कांचन चव्हाण (२३), सासरे भीमराव दलपत पवार (५०) व सासू वर्षा पवार (४५) रा. गारटेकी (मंठा जि. जालना), कारचालक पवन संतोष राठोड रा. आळंदी मुळगाव (पिंपरखेड ता. सिंदखेड राजा) यांच्यासह देवदर्शनाला जात होते.सातारा जिल्ह्यातील शिराळा येथील बायपासवरील गोरक्षनाथ मंदिर पुलाजवळ दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाची कारला धडक बसली. यात कैलास जागीच ठार झाले तर इतर गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु असून, एका होतकरु तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, पुण्यात बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सूस येथे कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले असून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात १८ फेब्रुवारी रोजी सकाळी घडला. साई भुजबळ असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी साई याचे चुलते संदीप प्रभाकर भुजबळ (वय ४६, चिंचवड) यांनी मंगळवारी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप यांचा पुतण्या साई भुजबळ हा चिंचवड येथून लवळे येथील सिम्बायोसिस कॉलेज येथे दुचाकीवरून जात होता. सूस गावात आल्यानंतर कारचालकाने कोणताही सिग्नल न देता अचानक कार वळवली. त्यामुळे कार आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून, साई भुजबळ गंभीर जखमी झाले आहेत. बावधन पोलिस तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.