स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पुणे हादरलं.

राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमधे बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. यातील पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांचा घटनांचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून आणखी एक प्रकरण समोर आल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे.घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे. दरम्यान आज ( 26 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास  पुण्यातील एसटी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडलीय.

गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असुन त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.पुढे आलेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव असून तो अद्याप फरार आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं. तर 24 तास येथून बसेस जात असतात. दरम्यान, बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे. स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही? हा प्रश्न आहे. यामुळं स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.