महाशिवरात्री निमित्त श्रीराम हौसिंग येथे दीपक महाराज शेळगावकर यांचे प्रवचन संपन्न .

महाशिवरात्री निमित्त श्रीराम हौसिंग येथे दीपक महाराज शेळगावकर यांचे प्रवचन संपन्न
भुसावळ प्रतिनिधीमहाशिवरात्री पर्व निमित्त श्रीराम हौसिंग सोसायटी येथे रामेश्वर महादेव मंदिर स्थापनेनंतर पहिला महाशिवरात्री उत्सव सोसायटीतील शिवभक्तांनी विविध कार्यकमांचे आयोजन करून संपन्न केला. आदल्या दिवशी मंदिर व परिसर शुद्ध करण्यात आला. आकर्षक पुष्प माला, स्वदेशी दीपमाला, भव्य शोभिवंत मंडप टाकून वातावरण भक्तीमय केले.

सकाळी प्रथम नियमित सामूहिक आरती झाली. नियोजित कार्यक्रमानुसार शिव पिंड अभिषेक, माळाजप, दीपक महाराज यांचे प्रवचन भगवान शिव अवतार रामेश्वर यावर आधारित श्लोक विवेचन प्रवचनातून उपस्थित भाविकांना करण्यात आले. वर्तमानात भेलेनाथ शिवाचे विचार आत्मसात करून दुःखी कष्टमय जीवनाच्या भवपाशातून मुक्ती मिळवण्याच्या टिप्स दिल्या. महाराजांचे प्रवचन श्रवणाचा लाभ जवळजवळ 110 लोकांनी घेतला.

सोसायटीतील माता-भगिनींची मोठी उपस्थिती होती. भगवान पाटील व बालुभाऊ कोल्हे यांच्या हस्ते सप्तनीक सहकुटुंब अभिषेक पौरोहित्य केले, तसेच  दीपक जोशी यांचे मंत्रोच्चार सफल झाले. मंत्रजपाच्या अंतर्गत महिलांनी तल्लीन होऊन शिवनामाचा एक तास जप केला व मानसिक शांती प्राप्त केली आणि पुण्यकर्म मिळवले.प्रभागाचे समाजसेवक बापु महाजन यांची पूर्ण वेळ उपस्थिती लाभली, तसेच फराळाचे वाटप करण्यात आले.सोसायटीतील सर्व नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.