पत्नीला फ्रेड रिक्वेस्ट पाठविली अन दोघांनी पतीला केली मारहाण !

शहरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने नेहमीच हाणामारीच्या घटना घडत असतांना आता पत्नीला फ्रेड रिक्वेस्ट पाठविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने दोघांनी जयेश जयप्रकाश जेवलानी (रा. ३०, रा. सिंधीकॉलनी) यांना बॅटसह लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना दि. २३ रोजी सिंधी कॉलनीतील संत कंवरराम प्रायमरी स्कुलसमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सिंधी कॉलनीतील नेत्रज्योती हॉस्पिटलसमोर राहणारे जयेश जयप्रकाश जेवलानी यांच्या पत्नीला संशयित साहील मकडीया याने फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली. त्याचा जाब विचारल्यासाठी जयेश जेवलानी हे त्याठिकाणी गेले असता, नितीन मकडीया व साहील मकडीया यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी नितीन मकडीया याने त्याच्या हातातील बॅटने जेवलानी यांच्या डोक्यावर वार केले तर साहील याने रॉडने त्यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले.

तसेच त्यांना जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. जेवलानी यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.