मराठा समाजाच्या आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, आरक्षणावरुन राज्य शासनाचा निषेध करत टोकाचं पाऊल.

मराठा आरक्षणासह आंदोलकांच्या विविध मागण्या अजुनही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. राज्य शासनाचा निषेध करत नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खूर्दे येथे मराठा समाजाच्या एका आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अटकाव करीत आंदोलकाला ताब्यात घेतले.आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या मराठा समाजाच्या संयमाचा बांध आता फुटताना दिसत आहे. आपल्या मागण्या पूर्ण होत नसून, सरकार दरबारी उदासिनता असल्याचे लक्षात आल्याने हतबल झालेल्या एका मराठा आंदोलकाने स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील दिड वर्षापासुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आंदोलन सुरु आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाने अनेक आंदोलने केली आहेत.

मात्र मराठा आरक्षणासह आंदोलकांच्या विविध मागण्या अजुनही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. राज्य शासनाचा निषेध करत नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खूर्दे येथे मराठा समाजाच्या एका आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अटकाव करीत आंदोलकाला ताब्यात घेतले.मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरीता गेल्या ४० वर्षांपासून राज्यभरात विविध आंदोलने, उपोषणे सुरू आहेत. त्यासाठी अनेक मराठा समाज बांधवांनी, युवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आंदोलन चिरडण्यासाठी अनेक युवकांवर, समाज बांधवांवर खोटे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. “आमच्या माय माऊलींवर लाठीचार्ज करुन त्यांचे डोके फोडण्यात आले आहे. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. तरी आमचा लढा सुरूच राहणार आहे” असे बंड मराठा आंदोलकांनी पुकारले आहे.विविध सामाजिक संघटना, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, मराठा परिवर्तन चळवळ आदी विविध संघटनेच्या माध्यमातुन लढा सुरूच आहे. मागील दिड वर्षापासुन मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने झाली आहेत. नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खूर्दे येथील गुलाब महाऊ मराठे यांनी तीन वेळा ९ दिवस आमरण उपोषण, ४० दिवस साखळी उपोषण व १२ दिवस आमरण उपोषणे केले. परंतु आजपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी पुर्ण झालेली नाही. म्हणून उमर्दे खूर्दे येथे गुलाब मराठे यांनी स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्या हातातील पेट्रोलची बाटली ताब्यात घेत त्यांना अटक केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.