एकीकडे ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असताना माजी आमदाराला थांबवण्यात पक्षाला यश येते का, पाहणं महत्त्वाचं आहे.अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका, पक्षाचं काम जोमाने जरा, उद्धव साहेब तुमची आठवण काढत आहेत, असा निरोप पुण्यातील शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना पोहोचवण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत बाबरांना निरोप पाठवला. विनायक राऊत यांनी महादेव बाबर यांना कॉल करुन पक्ष न सोडण्याची विनंती केल्याची माहिती आहे. एकीकडे ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असताना माजी आमदाराला थांबवण्यात पक्षाला यश येते का, पाहणं महत्त्वाचं आहे.










