‘इंडियाज गॉट लेंटेंट’ कार्यक्रमावरून रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवलं होतं. आता तो चौकशीसाठी हजर झाला.सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर रणवीर अलाहाबादिया अखेर चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाला. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमात अतिशय अश्लाघ्य वक्तव्य केल्या प्रकरणी पोलिसांनी रणवीरला समन्स बजावले होते. पोलिस चौकशीसाठी तो टाळाटाळ करत होता. माझ्या घरी येऊन जबाब नोंदवावा, अशी, मागणी त्यानं केली होती. अखेर पोलिसांनी फटकारल्यानंतर तो पोलिस ठाण्यात हजर झाला.रणवीर अलाहाबादिया यानं पोलिसांसमोर त्याची चूक मान्य केली आहे. मी जे काही बोललो ते चूकीचं होतं, मी चूक केली आहे, अशी कबुली त्यानं पोलिसांसमोर दिली. तसंच ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमात जाण्यामागचं कारणही त्यानं पोलिसांना सांगितलं.










