महिलेला ती चेटकीण असल्याचं म्हणत संपवलं, सकाळी शेतात भयंकर दृष्य; घटनेने एकच खळबळ.

महिलेला ती डायन, चेटकीण असल्याचं हिणवून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.एका महिलेला ती डायन, चेटकीण असल्याचं सांगत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह शेतात फेकण्यात आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी शेतात मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं.स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय तेतरी देवी यांना त्यांच्या नातेवाईकांकडून डायन असल्याचं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला जात होता. अनेकदा महिलेवर अशाप्रकारचे आरोप केले गेले होते.

शनिवारी शेतात ग्रामस्थांना एका महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह दिसल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. बिहारमधील गया जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली.महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलीने आपल्या आईच्या मृत्यूसाठी आरोपींसह प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. मुलीने सांगितलं, की घटना घडण्याआधीच कुटुंबाने पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. मुलीने सांगितलं, की याआधी तिच्या वडिलांनाही झारखंडला नेत त्यांना मारहाण करण्यात आली होती. पण त्यावेळीही प्रशासनाने कोणतंही पाऊल उचललं नाही.

आता आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत कुटुंबीयांनी महिलेवर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत गावात मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात केली असून आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या हत्या मिळताच घटनास्थळी फॉरेंसिक टीम बोलण्यात आली तसंच पुरावे जमा करण्यात आले. प्राथमिक तपासात तेतरी देवी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचा वाद असल्याचं समोर आलं आहे. यावरुनच महिलेला डायन बोलून तिचा छळ केला जात होता. याप्रकरणात जे संशयित आहेत, ते फरार असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, महिलेच्या जाण्याने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.