आई आणि आजीनेच दिव्यांग मुलीचा जीव घेतला, नंतर गुपचूप अंत्यसंस्कारही उरकले; ठाण्यातील संतापजनक घटना.

अंथरुणाला खिळून असलेल्या १७ वर्षाच्या दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिला गावी नेऊन गुपचूप अंत्यसंस्कार केल्याच्या प्रकरणात तिच्या आईसह आजीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंथरुणाला खिळून असलेल्या १७ वर्षाच्या दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिला गावी नेऊन गुपचूप अंत्यसंस्कार केल्याच्या प्रकरणात मुलीची आई, आजी आणि अन्य एक महिला अशा तिघींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. या मुलीला संशयितरित्या गोळ्या दिल्यानंतर मृत्यू झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.ठाण्यातील शिवाजी पथ परिसरातील चाळीत ही मुलगी आई, वडील आणि आजीसोबत राहत होती. तसेच, ती जन्मापासूनच दिव्यांग असल्याने अंथरुणाला खिळून होती.

तिचे वडीलही गेल्या पाच वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. ठाण्यातच राहणारी मुलीची मावस आत्या मुलीच्या घरी आल्यानंतर तिला ही मुलगी घरात दिसली नाही. त्याचवेळी आत्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील एक व्हिडिओ बघण्यास मिळाला. त्यामध्ये मुलीची आई, आजी, आणि आईची मैत्रीण अशा तिघीजण प्रेतासारखे दिसणारे काहीतरी कापडामध्ये गुंडाळून गाडीमधून घेऊन जात असल्याचे दिसून आले. आत्याच्या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी चौकशी चालू केली.मृत मुलीच्या घरी जात पोलिसांनी मुलीच्या आजीकडे चौकशी केल्यानंतर मृत मुलीला १५ फेब्रुवारीपासून जास्त त्रास होण्यास सुरुवात झाली. या गोष्टीला कंटाळून १९ फेब्रुवारी रोजी रात्री आईने मुलीला कोणत्यातरी गोळ्या दिल्या. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा मुलीचा मृतदेह वाहनामधूम सातारा जिल्ह्यातील गावी नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची बाब उघडकीस आली.

मावस आत्याच्या तक्रारीनंतर मुलीची आई, आजी आणि अन्य एक महिआ अशा तिघांविरुद्ध सोमवारी नौपाडा पोलिस ठाण्यात हत्या, पुरावा नष्ट करणे, गुन्ह्यात मदत करणे आदी कलमातंर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.