ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह तिघांवर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारत पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी ची मॅच भारताने जिंकल्यावर सगळीकडे जल्लोष साजरा होत असतानाच मारून मध्ये एक राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित व्यक्तींना अटक केली आहे. शिवसेनेचे युवा नेते आमदार निलेश राणे यांनीही राष्ट्राविरोधी घोषणा देणाऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह तिघांवर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याबाबतची तक्रार सचिन वराडकर यांनी पोलिसांत दिली आहे.वराडकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आंगणेवाडी यात्रेतून काल रात्री माघारी परतल्यानंतर शहरातील वायरी येथील मित्राकडे जात असताना रात्रौ साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तारकर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही मुले उभी होती. भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान त्यातील एक मुलगा हा भारत देशाच्या विरोधात घोषणा देत होता. त्याला याबाबत विचारणा केली असता तो पळून गेला.









