‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन झालं आहे.मालिकाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून टीव्ही मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम टीव्ही अभिनेता संतोष हणमंत नलावडे यांचं निधन झालं आहे. संतोष यांचा अवघ्या ४९व्या वर्षी नांदेड येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला.
संतोष नलावडे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागात कार्यरत होते. नांदेड येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले असताना त्यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना काल (सोमवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर वाढे (ता. सातारा) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.









