आजोबांकडून पैसे घेऊन खाऊ घेण्यासाठी घराबाहेर पडलेला चिमुकला बेपत्ता झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.बेपत्ता झालेल्या एका ८ वर्षांच्या निरागस चिमुकल्याचा मृतदेह घराजवळील तलावाजवळ आढळून आला. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडावी आहे. हा चिमुकला खाण्याच्या गोष्टी घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. पोलिसांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलावाजवळील खाणीत रविवारी त्याचा मृतदेह आढळल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलाच्या डोक्यावर जखमेच्या खुणा असून तोंडातून फेस येत असल्याचा दावा मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.










