घरगुती वादातून पती जीवावर उठला, पत्नीला कोल्ड्रिंकमधून पाजलं विष, छत्रपती संभाजीनगरात खळबळ.

कौटुंबिक न्यायलयात दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी देत विवाहितेला विषारी औषध पाजण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.कौटुंबिक न्यायलयात दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी देत विवाहितेला विषारी औषध पाजण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना १८ फेब्रुवारीला रात्री साडेआठला नारेगाव येथील भारत काट्याजवळ घडली. या प्रकरणात विष पाजणाऱ्या शेख मोईन शेख चाँद (वय ४०, रा. अंबड जि. जालना), रईस बेग अमीन बेग (वय ३०) आणि नाजेरा (वय ३२) या तिघांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात शहिस्ता मोईन शेख (वय ३२, रा. अजिज कॉलनी, नारेगाव) यांनी तक्रार दिली. शहिस्ता व शेख मोईन यांचे लग्न झालेले असून, त्यांच्यात वाद असल्याने ते विभक्त राहतात.

शाहिस्ता यांनी कौटुंबिक न्यायलयात पती व त्याच्या नातेवाइकाविरोधात याचिका दाखल केलेली आहे.शाहिस्ता शेख या १८ फेब्रुवारी रोजी रात्री घरी असताना शेख माईन, रईस बेग आणि नाजेरा हे तिघे विवाहितेला भेटण्यासाठी आले. या तिघांनी शाहिस्ता शेख हिला भेटण्यासाठी नारेगावातील भारत काटा येथे बोलावले. त्यानुसार, शाहिस्ता तेथे गेली असता तिघांनी तिला कौटुंबिक न्यायलयात टाकलेली केस परत घे, तुला सोडचिठ्ठी देतो असे सांगितले. यानंतर कोल्ड्रींकच्या बाटलीत विषारी औषध टाकून शाहिस्ता हिला पिण्यासाठी दिले. शाहिस्ता हिला कोल्ड्रींक प्यायल्यानंतर चक्कर आली. हे पाहून तिघे पळून गेले. या प्रकरणात मोईन शेख याच्यासह अन्य दोन जणांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत.जुन्या वादातून अक्षय अर्जुन वानखेडे (वय २९, रा. पवननगर, एन-९) याला विष्णु मेघावाले, चरण मेघावाले (दोघे रा. स्वमी विवेकानंद नगर, एन-१२) आणि पृथ्वीराज राजपूत (रा. मयूरपार्क) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊला जिजाऊ चौकात घडली. या प्रकरणी अक्षय वानखेडे याच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या तिघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार तेलूरे हे करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.