दुभाजकावर धडकताच सीएनजीने पेट घेतला, गाडीला आगीने वेढले, पोलिसासह दोघांचा जळून कोळसा.

बीडकडून जामखेडच्या दिशेने आलेली अर्टिगा कार क्रमांक MH 16 DM 5893 ही राऊत मैदानाजवळ कावेरी हॉटेलपाशी डिव्हायडरला धडकली आणि कारला आग लागली.दुभाजकाला चारचाकी गाडी धडकल्यानंतर वाहनातील सीएनजी गॅसने पेट घेतला आणि गाडीला आग लागली. या भीषण अपघातात दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याही समावेश आहे. अहिल्यानगर येथील बीड रोडवर हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग विझवण्यात आली, परंतु तोपर्यंत दोघांचा जळून मृत्यू झाला होता.बीडकडून जामखेडच्या दिशेने आलेली अर्टिगा कार क्रमांक MH 16 DM 5893 ही राऊत मैदानाजवळ कावेरी हॉटेलपाशी डिव्हायडरला धडकली आणि कारला आग लागली. आगीमध्ये २८ वर्षीय महादेव दत्ताराम काळे आणि ३५ वर्षीय धनंजय नरेश गुडवाल हे दोघे जळून मृत्युमुखी पावले आहेत.

गुडवाल हे जामखेड पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते.नगर जिल्ह्यात जामखेड शहरातील बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. रस्त्यावरील दुभाजकाला चारचाकी वाहन धडकले. त्यामुळे गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. गाडीतील दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला.ही दुर्दैवी घटना आज, सोमवार २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली.जामखेड नगर परिषदेच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले, मात्र तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.