अनिश्चित काळासाठी कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्दचा निर्णय, प्रवासी वाहतूक कोलमडणार.

कोल्हापूर आगारातून जाणाऱ्या 50 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामधून सीमाभागात एसटीतून प्रवाशांचा प्रवास होत असतो. आता बसेस बंद केल्याने बेलगाव, बंगळूरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेला भाषिक वाद आता बसेसवर उफाळून येऊ लागला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील चालकाला मारहाणीची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत.

कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य परिवहन बसच्या चालकाला मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर कन्नड रक्षा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बसचालकाच्या तोंडाला काळे फासले. यासोबतच बसलाही काळे फासण्यात आले आहे. याविरोधात ठाकरे यांच्या शिवसेनेने कोल्हापुरात जोरदार आंदोलन केले.त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. कोल्हापूर आगारातून जाणाऱ्या 50 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामधून सीमाभागात एसटीतून प्रवाशांचा प्रवास होत असतो. मात्र, आता बसेस बंद केल्याने बेलगाव, बंगळूरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे. दरम्यान, कर्नाटकातील चित्रदुर्ग भागात कन्नड रक्षा वेदिका कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन बसच्या चालकाला मारहाण केली. याच्या निषेधार्थ आता ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक झाली. संतप्त शिवसैनिकांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्नाटक राज्याच्या एसटी बसेस रोखल्या. शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात निषेध करण्यात आला. कर्नाटक एसटीवर शिवसेनेकडून भगवे झेंडे फडकवण्यात आले. कर्नाटकात कन्नड रक्षा वेदिकाच्या कार्यकर्त्यांनीही या मुद्द्यावर निषेध नोंदवला. एमएसआरटीसी बसवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन बसेसची सेवा बंद करण्याचे आदेश दिले. सरनाईक म्हणाले की, बेंगळुरूहून  येत असलेल्या  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवर शुक्रवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मंत्र्यांनी सांगितले की, कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी चालक भास्कर जाधव यांच्या तोंडाला काळे फासले आणि त्यांना मारहाण केली. कर्नाटक सरकार या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत बससेवा पूर्ववत होणार नसल्याचे सरनाईक म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.