केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या 23 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा दौरा खालील प्रमाणे
रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायं. 7 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मुक्ताईनगरकडे प्रयाण, रात्री 10:30 वाजता मुक्ताईनगर आगमन व मुक्काम, सोमवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मुक्ताईनगरहून रावेर तालुक्यातील पाल येथे प्रयाण, दुपारी 1:30 ते 3:50 वाजता कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे ‘किसान सन्मान कार्यक्रम’, संध्याकाळी 5 वाजता पालहून मुक्ताईनगरकडे प्रयाण व मुक्काम, मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगरहून जळगावकडे प्रयाण, सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत भाजप कार्यालय, जळगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक, संध्याकाळी 3 वाजता जळगावहून मुक्ताईनगरकडे प्रयाण, संध्याकाळी 4 ते 6 वाजता मुक्ताईनगर येथे निवासी शिबिर कार्यालयात शासकीय कामकाज, संध्याकाळी 6 ते 8 वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक, मुक्ताईनगर येथे मुक्काम.









