आधी भावाचं अपहरण केलं अन् नंतर बहिणीवर नराधमांनी केले सामूहिक अत्याचार;

भिंवडीमधून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भिवंडीतील एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले नंतर त्याच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.भिंवडीमधून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भिवंडीतील एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले नंतर त्याच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. नराधमांनी आधी भावाचे अपहरण केले, त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या बहिणीकडे खोटी बतावणी करुन तिला बोलावले आणि तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी सहा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भिवंडीतील शांतीनगर परिसरात वास्तव्यास असणारी तरुणी तिच्या आतेबहि‍णीकडे गेली असता तिला भावाचे सारखे मिस्डकॉल येत होते. यावेळी तिला रात्री १२ वाजता तिला अचानक जाग आली तेव्हा मोबाईल वरील अनेक मिस्डकॉल पाहून तिने भावाला चौकशीसाठी फोन केला. यावेळी भावाने सांगितले की, माझी तब्येत ठीक नाही तू ताबडतोब बागे फिरदौस या ठिकाणी ये. ती रिक्षाने घराकडे निघाली असताना वाटेत रिक्षा चालक आणि बागे फिरदौस येथे उपस्थित असलेल्या तिच्या भावाला जबर मारहाण करण्यात आली आणि तरुणीचं अपहरण करण्यात आले आणि परिसरातील निर्जनस्थळी झाडाझुडपात बलात्कार करण्यात आला.बागे फिरदौस येथून तरुणीसह तिच्या भावालाही रिक्षा जबरदस्ती बसवून नेण्यात आले. आरोपी सदरे उर्फ मोहम्मद सईद आलम, पाशा, लड्डू ,गोलू आणि इतर दोन जण (सर्व राहणार फा. नगर) यांनी आपसांत संगनमत करून तरुणीला जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडाझुडपात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

एवढ्यावरच न थांबता वासनांध नराधमांनी तिला पुन्हा फातमा नगरात आणले आणि तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीमध्ये पुन्हा तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. नंतर तिला धमकीसुद्धा देण्यात आली. एवढे सगळे घडल्यानंतर नराधम पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षा चालकाला सोडून तेथून पसार झाले.या भयंकर घटनेनंतर तरुणीने धाडस करुन पोलिसांत धाव घेतली आणि तिच्यासोबत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस गुन्हा दाखल केला आहे. तर ही घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तो त्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याने पोलिसांनी सांगितले. दरम्यान ६ जणांपैकी एकाला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.