तेलंगणात मोठी दुर्घटना! बोगद्याचे छत कोसळून आठ श्रमिक अडकले; बचावकार्य सुरु.

 तेलंगणामधील श्रीशैलम लेफ्ट बैंक कॅनॉल (एसएलबीसी) प्रकल्पाच्या बोगद्याच्या बांधकाम सुरू असलेल्या छताचा भाग कोसळल्याने शनिवारी आठ जण आत अडकले, अशी माहिती तेलंगणाचे सिंचन मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी शनिवारी दिली. तेलंगणामधील श्रीशैलम लेफ्ट बैंक कॅनॉल (एसएलबीसी) प्रकल्पाच्या बोगद्याच्या बांधकाम सुरू असलेल्या छताचा भाग कोसळल्याने शनिवारी आठ जण आत अडकले, अशी माहिती तेलंगणाचे सिंचन मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी शनिवारी दिली.’गेल्या वर्षी उत्तराखंडमधील बोगदा दुर्घटनेतील बचावकार्यात सहभाग घेतलेल्या तज्ज्ञांची मदत राज्य सरकार घेत आहे.

तसेच लष्कर व एनडीआरएफची मदत मागितली आहे,’ असे त्यांनी नागरकुर्नूल जिल्ह्यातील अपघातस्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अडकलेल्या व्यक्तींमध्ये दोन अभियंते, दोन मशीन ऑपरेटर आणि चार कामगारांचा समावेश आहे.हे कर्मचारी बोगद्याच्या आत १४ किमी अंतरावर अडकले होते. पाणी आणि मातीची गळती हळुहळू सुरू झाली आणि नंतर वाढली. त्यामुळे कामगार बाहेर पडले. त्यांनी बोगद्याच्या बाहेर काही ‘भूगर्भीय अस्थिरता’ जाणवल्याने मोठा आवाजही ऐकला, असे रेड्डी यांनी सांगितले. बोगद्याच्या आत बोरिंग मशीनच्या पुढे काम करणारे कामगार तिथेच अडकले होते, असेही त्यांनी सांगितले. सरकार त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबाबत उत्तराखंड घटनेतील व्यक्तींना वाचवणाऱ्या तज्ज्ञांशीही चर्चा केली आहे, असे त्यांनी सांगितले.राज्य अग्निशमन सेवा, आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी बचावकार्यासाठी सज्ज असून भूगर्भीय हालचाली स्थिर झाल्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सिंगरेणी कोलीरीज कंपनी लिमिटेडचे १९ सदस्यांचे विशेष पथक बचावकार्यासाठी श्रीशैलम डाव्या कालव्याकडे रवाना झाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.