आजारपणाला कंटाळून शेतकऱ्याचा शेवटचा निर्णय, पिस्तुलाने डोक्यात झाडली गोळी, पुण्यातील घटना.

आजाराला कंटाळून कुंजीरवाडी येथील धुमाळ मळा परिसरातील शेतकऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. बाळासाहेब निवृत्ती कुंजीर (वय ६१) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.आजाराला कंटाळून कुंजीरवाडी येथील धुमाळ मळा परिसरातील शेतकऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. बाळासाहेब निवृत्ती कुंजीर (वय ६१) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल होते. त्यातूनच त्यांनी गोळी झाडून घेतली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब कुंजीर कुटुंबासोबत कुंजीरवाडी परिसरात राहतात. कुंजीर यांना मधुमेहाचा त्रास होता; तसेच त्यांना चार वर्षांपूर्वी करोनाची लागण झाली होती.

त्या वेळी ‘म्युकर मायकोसिस’ची बाधा झाली. त्यात त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. यामुळे अनेक शारीरिक मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे ते शक्यतो घरातच राहत असत. दरम्यान, कुंजीर यांच्या नातेवाइकांच्या घरी शुक्रवारी कार्यक्रम होता. त्यामुळे घरातील सर्व सदस्य कार्यक्रमाला गेले होते. तेंव्हा कुंजीर घरात एकटेच होते. घरातील मंडळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरी आली. त्या वेळी कुंजीर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर कुंजीर यांच्या मुलाने लोणी काळभोर पोलिसांनी माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच, सहायक आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी कुंजीर यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कुंजीर यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.तारकर्ली समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या मामा-भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. शुभम सुनील सोनावणे (वय २२) आणि रोहित बाळासाहेब कोळी (वय २१, दोघे रा. उरुळी देवाची पोलिस ठाण्याच्या मागे, सासवड रोड) अशी मृतांची नावे आहेत. रोहित हा एरोनॉटिकल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात एक बहीण, आई आणि वडील असा परिवार आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात. शुभम याचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्याच्या पश्चात एक बहीण आई, वडील असा परिवार आहे. शुभमचे वडील टेलर आहेत. त्याला स्वतःची पॅथलॅब सुरू करायची होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.