भरधाव वेग अन् दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक, तिघांनी जागीच जीव गमावला, वसईत हळहळ.

 वसईत दोन दुचाकींची समोरासमोरा धडक झाली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला.वसईत एका भीषण अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. वसई पूर्वेतील मधुबन परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा स्मार्ट सिटीजवळ मुख्य रस्त्यावर ही भीषण अपघात घडला. यावेळी दोन दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या आणि त्यात दोन्ही वाहनांवरील तिघे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
सध्या या तिघांची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. एकाचवेळी तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ८ वाजेच्या सुमारास वसईतील मधूबन परिसरात तिघांचा मोठा अपघात झाला. भरधाव वेगातील एक्टिवा आणि बाईक यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.वसई येथील राजीवली परिसरात रस्ता निमुळता असल्याने अंदाज न आल्याने दोन्ही वाहने एकमेकांवर धडकली आणि हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळाचा पंचानामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातातील मृतांची ओळख पटलेली मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.आईनेच आपल्या मुलीची हत्या केल्याची घटना शनिवारी नालासोपाऱ्यात घडली. मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या आईने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या दडपण्यासाठी मुलीने गळफास लावल्याचे आईने पोलिसांना सांगितले होते. मात्र शवविच्छेदन अहवालातून शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. हत्या करण्यासाठी तिच्या अल्पवयीन बहिणीनेही मदत केल्याने पोलिसांनी आई आणि बहिणीला अटक केली आहे.नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव येथील जय विजय नगरी या इमारतीत पीडित मुलगी आईवडील तसेच लहान बहिणीसह रहात होती. गुरुवारी दुपारी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आईने नालासोपारा पोलिस ठाण्यात दिली होती. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यू ही आत्महत्या नसून गळा आवळून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कसून चौकशी केली असता ही मुलगी गर्भवती राहिल्याचे तिच्या आईनेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले. ही हत्या दडपण्यासाठी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आईवर शनिवारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दुसरी आरोपी अल्वपयीन असल्याने तिला सुधारगृहात दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.