महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला करण्यात आला असून एसटी चालकाला काळे फासून मारहाण करण्यात आली आहे. यापाठोपाठ महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ठाकरे गट आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला केलाय. फक्त हेच नाही तर त्यांनी मुजोरी करत एसटी चालकाच्या तोंडालाही काळे फासत मारहाण केलीये. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न निर्माण झालाय. या घटनेनंतर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय. आता या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय.










