नाशिकमध्ये एका धार्मिक स्थळाच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू संघटनांन काही आरोप केली आहेत. अतिक्रमण कारवाई पूर्ण झाली नसल्याचे सांगत. संघटना आंदोलन करत होत्या. यादरम्यान पोलिसांनी काही लोकांना आणि महंत सुधीरदास पुजारी यांना ताब्यात घेतले आहे.नाशिकमध्ये एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झालाय. नाशिकमधील हिंदू संघटना एका दर्ग्याबाबत संतप्त असून त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. हा दर्गा अतिक्रमण करून बांधण्यात आला असून तो बेकायदेशीर असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. धार्मिक स्थळावरील अतिक्रमण कारवाई दरम्यान अनुचित प्रकार घडू नये, याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, अतिक्रमण कारवाई पूर्ण झाली नसल्याने हिंदू संघटना या आक्रमक झाल्या आहेत.










