मैत्रिणींना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणावर संशय घेत गावकऱ्यांनी त्याला आणि त्याच्या मित्रांना रात्रभर डांबून ठेवत अमानुष मारहाण केली. या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह गावातील नाल्यात फेकून देण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.मैत्रिणींना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणावर संशय घेत गावकऱ्यांनी त्याला आणि त्याच्या मित्रांना रात्रभर डांबून ठेवत अमानुष मारहाण केली. या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह गावातील नाल्यात फेकून देण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील काळापाणी गावात घडली.शिरपूर तालुक्यातील उमर्दा गावातील २० वर्षीय कमलसिंग पावरा हा आपल्या तीन मित्रांसोबत काळापाणी गावात गेला होता. स्थानिक गावातील एका मुलीला भेटण्यासाठी ते तिथे पोहोचले होते. मात्र, गावकऱ्यांना या गोष्टीचा संशय आल्याने त्यांनी चौघांना पकडले आणि एका घरात डांबून ठेवले. यानंतर, संपूर्ण रात्रभर त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली.










